सामाजिक क्षेत्र
भारत सरकारने एका व्यापक सामाजिक कल्याण प्रणालीची स्थापना केली आहे. अल्पसंख्याक समाजातील स्त्रिया व मुले, मागास प्रवर्ग, अनुसूचित जाति व जमाती यांच्या जीवनात गुणात्मक सुधारणा करण्याकरिता व कल्याणाकरिता अनेक कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत, यापैकी काही कार्यक्रम खालीलप्रमाणे-
- मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणापर्यंत पोच, आरोग्य व पिण्याचे पाणी) व सामाजिक सुरक्षितता कार्यक्रम
- अंध, बधीर, मानसिकरीत्या अपंग आणि शारिरीकरित्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठीदेखील सेवा आहेत. निर्वासित लोकांसाठी, ग्रामीण समुदायाच्या विकासाकरीता कार्यक्रम.
- स्त्रियांसाठी असलेल्या कार्यक्रमांत कल्याण अनुदान, प्रौढ स्त्री-शिक्षण, नोकरदार स्त्रियांसाठी वसतिगृहे, कुटुंब नियोजन व प्रसूती संगोपन आदींचा समावेश.
- किशोरवयीन गुन्हेगार, वेश्या आणि दंडित गुन्हेगार यांच्या पुनर्वसनासाठी विशेष उपाय करण्याची योजना आहे.
- इतर सामाजिक कल्याण कार्यक्रमांअंतर्गत खालील बाबींचा समावेश आहे – दुष्काळ, पूर, भूकंप यासारखी नैसर्गिक संकटे आणि अस्पृश्यता निर्मूलन इत्यादीकरीता आपत्कालीन साहाय्य कार्यक्रम.
- वर उल्लेख केलेल्या उपक्रमांखेरीज, सरकार आणि गैर-सरकारी संघटना
खालील उपक्रमांवर मेहनत घेत आहेत आणि सामाजिक क्षेत्राच्या दिशेने काम
करीत आहेत, जसे:
- सामाजिक दुष्प्रथांवर विभिन्न पातळीवर जागृती मोहिमांचे आयोजन करणे (महिला सबलीकरण, बाल विवाह, स्त्रीभ्रूण हत्या, सर्व समान आहेत, मानवीय दलाली, हुंडा विरोध, मद्यपान विरोध, तंबाखूला नाही म्हणा, जादूटोणा आणि मंत्रतंत्र - सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन)
- संवेदनशील सामाजिक समुदायांसाठी पुनर्वसन केंद्रे (स्थलांतर, अनाथ आणि रस्त्यावर राहणारी मुले, अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक)
- सामाजिक सुरक्षितता योजना पुरविणे (अन्न मिळवण्याचा हक्क, ग्रामीण आवास योजना, रोजगार, निवृत्तीवेतन, कौटुंबिक आणि वैवाहिक लाभ)
ह्या भावनेसह, याच उद्देशांसाठी कार्यरत असलेल्या इंडिया डेव्हलपमेंट गेटवेचा ग्रामीण समुदायांमध्ये ह्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी माहिती, सामग्री, उत्पादने व सेवा पुरविण्याचा हेतू आहे.







100% employment for unemployed youth
But intrested Minority,Sc,ST yoyth not capable pay the fee for this 100% job / employment oriented training. we need help/ batch wise fees from any scheme .
We are ready to MoU / Agreement for the providing employment/job after the diamond training.
Pl. guides us. on this subject.