नॅशनल बायोगॅस अॅन्ड मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्राम
ह्या कार्यक्रमाची सुरूवात 1981-82
मध्ये बायोगॅस विकासासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या रूपाने करण्यात
आली.
-
- ग्रामीण घरांना कुटुंब-पातळीवरील छोट्या बायोगॅस संयंत्रांद्वारे
स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरवणे
- ग्रामीण भागातील महिलांची ढोरमेहनत कमी करणे, जंगलांवर येणारा दबाव
कमी करणे व ह्यांद्वारे होणारे सामाजिक फायदे अधोरेखित करणे
- खेड्यांमधील स्वच्छतागृहे बायोगॅस संयंत्राशी संलग्न करून तेथील
सांडपाण्याची व्यवस्था सुधारणे
|
|
-
- बायोगॅस संयंत्रांच्या स्थानिकरीत्या विकसित केलेल्या नमुन्यांना
प्रोत्साहन दिले जाते.
- अंमलबजावणीकरिता राज्य शासनाने विशिष्ट (उपशाखीय) विभाग तसेच संस्था
नियुक्त केल्या आहेत. खादी व ग्रामीण उद्योग आयोग (मुंबई), राष्ट्रीय
दुग्धविकास महामंडळ (आणंद - गुजरात) तसेच राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील
स्वयंसेवी संघटनादेखील अंमलबजावणीमध्ये गुंतल्या आहेत.
- प्रकल्पामध्ये वापरकर्त्यांना केंद्राकडून अर्थसहाय्य देणे,
उद्योजकांना महत्वपूर्ण कामांचा मोबदला देणे, उद्योजकांना महत्वाच्या
कामांची फी देणे, राज्यांच्या उपशाखीय विभागांना व संस्थांना सेवेचा
मोबदला देणे, प्रशिक्षण व प्रसिद्धीसाठी सहाय्य प्रदान करणे ह्यांसारख्या
आर्थिक प्रोत्साहनांच्या विविध प्रकारांचा समावेश आहे.
- विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सहाय्य केले जाते. नऊ
मोठ्या राज्यांमधील बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्रातर्फे राज्यांच्या
उपशाखीय विभागांना व संस्थांना तांत्रिक व प्रशिक्षणात्मक सहाय्य प्रदान
करतात.
व्यापारी व सहकारी बँका शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या क्षेत्रामध्ये
बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी कर्जे देतात. शेती व ग्रामीण विकासासाठीची
राष्ट्रीय बँक (नाबार्ड - NABARD) बँकांना आर्थिक पुनर्सहाय्य आपोआप
मिळण्याची सुविधा देते.
|
|
-
|
नमुना
|
मान्यताप्राप्त क्षमता (दरदिवशीचे गॅसचे उत्पादन,
घनमीटरमध्ये)
|
|
फ्लोटिंग ड्रम प्रकारचे बायोगॅस संयंत्र - KVIC नमुना
|
1 ते 10
|
|
KVIC नमुना - फेरोसिमेंट डायजेस्टर तसेच /
अथवा
फायबरग्लास रीइनफोर्स्ड (एफआरपी) गॅस होल्डर
|
1 ते 10
|
|
दीनबंधू
नमुना
|
1 ते 6
|
|
फेरोसिमेंटने प्रत्यक्ष जागेवर बांधला जाणारा (इन-सिटु) दीनबंधू
नमुना
|
1 ते 6
|
|
प्रगति नमुना
|
1 ते 6
|
|
रबरयुक्त नायलॉनचा बॅग डायजेस्टर असलेला फ्लेक्सी
नमुना
|
1
ते 6
|
- शक्ति-सुरभि एफआरपी (FRP) आधारित तरंगत्या घुमटाकार केव्हीवआयसी
डिझाइनवर आधारित पूर्व-निर्मित वहनीय (पोर्टेबल) मॉडेल बायोगॅस, विवेकानंद
केंद्र, कन्याकुमारी द्वारे विकसित संयंत्र
- सिन्टेंक्सि मेक प्लॅस्टिक आधारित तरंगत्या घुमटाकार केव्हीदआयसी
प्रकार बायोगॅस संयंत्र, सिन्टेनक्से इंडस्ट्रीज लिमिटेड, कलोल (गुजराथ)
द्वारे विकसित
- सॉलिड स्टेट दीनबंधू नमुन्याचे स्थिर बायोगॅस संयंत्र, आयसीएआर द्वारे
विकसित.
|
|
ग्रामीण ऊर्जा कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीसाठी उपशाखीय विभाग व उपशाखीय संस्था
-
|
वर्गीकरण
|
प्रत्येक संयंत्रामागे दिले जाणारे केंद्रीय अनुदान
|
|
ईशान्येकडील राज्ये व सिक्किम (आसामचे सपाट प्रदेश वगळून)
|
रु. 14,700/-
|
|
आसामचे सपाट प्रदेश
|
रु. 9,000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी
रु. 10,000/- पर्यंत मर्यादित)
|
|
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल (तराई प्रदेश
वगळून),
तामिळनाडूमधील निलगिरी, सदर कुरसुंगड व कालिपॉँग, दार्जिलिंग जिल्ह्याचे
उपविभाग (प. बंगाल), सुंदरबन, अंदमान व निकोबार बेटे
|
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु.
10000/- पर्यंत मर्यादित)
|
|
इतर सर्व वर्ग
|
रु. 4000/- (2-4 घनमीटर फिक्स्ड डोम प्रकारासाठी रु. 8000/- पर्यंत
मर्यादित)
|
ii) बायोगॅस संयंत्राशी
संलग्न
स्वच्छतागृहे - अशा प्रत्येक
संयंत्रांसाठी रु.1000/- चे अतिरिक्त अनुदान दिले जाते.
iii) 5 वर्षे मोफत देखभाल व वॉरंटीशी
संबंधित टर्न-की (चालनादायक) कामाची फी - रु.1500/-
.
iv) जुन्या, बंद पडलेल्या संयंत्रांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक
सहाय्य - लाभार्थी तसेच विभागास लागू असल्याप्रमाणे केंद्रीय अनुदानाच्या
दराच्या 50 टक्क्यांपर्यंतचे सहाय्य घरगुती प्रकारची बायोगॅस संयंत्रे
दुरुस्त व पुन्हा चालू करण्यासाठी मिळू शकते. मात्र अशी संयंत्रे किमान 5
वर्षे जुनी असावी व मूलभूत दुरुस्त्यांच्या अभावी बंद पडलेली असावी.
|
|