ग्रामीण भारतास प्रकाशित करण्‍यासाठी सौर उर्जा उत्‍पादन करून लक्षावधी जीवने उजळतांना

वीज हा ग्रामीण विकासाचा अत्‍यंत महत्‍वाचा घटक आणि ग्रामीण समुदायांच्‍या अत्‍यंत महत्‍वपूर्ण व आधारभूत गरजांपैकी एक आहे. ग्रामीण घरांमध्‍ये उजेडासाठी (प्रकाशासाठी) बहुतेक घासलेट, गोवर्‍या आणि लाकडाचा वापर करतात.

लायटिंग अ बिलियन लाइव्‍हज् (एलएबीएल - LaBL) मोहीम ही TERI च्या पुढाकाराने चालवली जात आहे आणि उजेडाच्‍या स्‍वच्‍छ, आधुनिक आणि विश्‍वसनीय स्‍त्रोतापासून वंचित असलेले तसेच उजेडासाठी सध्‍या घासलेटचा वापर करणारे ग्रामीण समुदाय हे तिचे लक्ष्य आहे.

LaBL च्‍या प्रारूपाची अंमलबजावणी ही एक फी-फॉर-सर्व्हिस आधारित पध्‍दत आहे ज्‍यामध्‍ये सौर कंदील व मोबाइल फोन चार्जिंग, बॅटरी चार्जिंग, जल शुध्‍दीकरण, आणि आयसीटी अनुप्रयोग इतर महत्‍वाच्‍या सेवा अत्‍यंत किरकोळ रीचार्जिंग फीच्‍या मोबदल्‍यात सर्व घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी उपलब्‍ध करून दिल्या जातात. TERI ही अशा LaBL भागीदार संघटनांशी निगडित आहे ज्‍या एनजीओ क्षेत्रातील तृणमूल पातळीवरील संस्‍था आहेत तसेच प्रकल्‍पाच्‍या कार्यान्‍वयनासाठी स्‍थानिक सरकारी विभागांसोबत कार्य करतात. ह्या सेवा टेक्‍नॉलॉजी रीसोर्स सेंटर्स ((TRC) च्‍या नेटवर्कद्वारे प्रभावी विक्रीनंतरचा पुरवठा आणि सेवांची हमी देतात.

जास्‍त माहितीसाठी येथे भेट द्या http://labl.teriin.org    


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: