लहान मुलांचे शोषण
बाल शोषणावर एक अध्ययन: इंडिया 2007, चे आयोजन महिला व बाल विकास
मंत्रालय (जीओई-भारत सरकार) तर्फे करण्यात आले ज्यायोगे असे स्पष्ट झाले
की वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचारांमध्ये, लहान मुलांस, म्हणजे 5 ते
12 वर्षे वयोगटातील मुलांना अत्याचार व शोषण यांस बळी पडण्याचा फार जास्त
धोका असतो. या अत्याचारांमध्ये शारीरिक, लैंगिक तसेच मानसिक अत्याचारांचा
समावेश होतो.
हे अध्ययन खालील तथ्यांवर प्रकाश
टाकते
-
- दर तीन मुलांपैकी दोन मुलांवर शारीरिक अत्याचार करण्यात आला
होता.
- शारीरिक अत्याचार झालेल्या 69% मुलांपैकी 54.68% मुलगे होते.
- 50% पेक्षा अधिक मुलांचा एक किंवा दुसरया स्वरूपात शारीरिक छळ केला
जात होता.
- कौटुंबिक परिस्थितिंमध्ये शारीरिक छळ होत असलेल्या मुलांपैकी, 88.6%
मुलांचा छळ त्यांच्या आई-वडिलां कडूनच करण्यात आला होता.
- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार व दिल्ली या राज्यांत लहान मुलांवरील सर्व
स्वरूपाच्या अत्याचाराचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत बहुतेक निरंतर
वाढतच गेल्याचे आढळले आहे.
- 50.2% मुले आठवड्याचे सात ही दिवस काम करीत असत.
|
|
-
- 53.22% मुलांनी एक किंवा अधिक प्रकारच्या लैंगिक अत्याचारास तोंड
दिले असल्याचे सांगितले.
- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार व दिल्ली या राज्यांत मुलगे व मुली,
दोघांवरील लैंगिक अत्याचाराची टक्केवारी सर्वात जास्त असल्याचे आढळून
आले.
- 21.90% मुलांना गंभीर स्वरूपाच्या तर ५०.७६% मुलांना इतर प्रकारच्या
लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावे लागत असल्याचे कळून आले.
- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार व दिल्ली या राज्यांतील मुलांनी सर्वाधिक
लैंगिक अत्याचाराचे प्रमाण नोंदविले.
- 50% अत्याचार हे मुलांच्या ओळखीच्या व्यक्तींनी केले किंवा विश्वास व
जवाबदारीच्या परिस्थितिंमध्ये करण्यात आले होते.
|
|
-
- प्रत्येक दुसर्या मुलाने मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागले
असल्याचे सांगितले.
- मानसिक अत्याचाराला तोंड द्याव्या लागणार्या मुलगे व मुली यांची
टक्केवारी सारखीच होती.
- 83% घटनांमध्ये आई-वडिल हेच मानसिक अत्याचार करत होते.
- 48.4% मुलींनी त्या मुलगा असत्या तर चांगले झाले असते असे मत व्यक्त
केले.
|
|