|
राष्ट्रीय पातळीवरील गणित ओलंपियाड हा राष्ट्रीय
बोर्डाच्या उच्चतर गणित (एन.बी.एच.एम.) (NBHM) विषयासाठीचे 1986
मधील फार मोठा पुढाकार आहे. उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधून गणित विषयात
तज्ञ असेलेले विद्यार्थी शोधणे या मागचा एक महत्वाचा उद्देश आहे.
एन.बी.एच.एम. ने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे व दरवर्षी होणा-या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओलंपियाड साठी तयारी करुन घेण्याची देखील
जबाबदारी घेतली आहे.
ओलंपियाड स्पर्धांवर देखरेख करण्याच्या उद्देशाने, देशाचे 16
भागांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड
(आय.एम.ओ.) (IMO) मध्ये भारतामधून सहभागासाठी खालील टप्पे पार करावे
लागतात :
चरण 1:
विभागीय गणित ओलंपियाड
(आर.एम.ओ) : आर.एम.ओ साधारणपणे
सप्टेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या रविवारी दर वर्षी वेगवेगळ्या
देशात संपन्न होतात. सर्व शाळांमधील 11वी इयत्तेत शिकणारी मुले आर.एम.ओ
साठी पात्र ठरतात. या ओलंपियाडच्या अंतर्गत 3
तासांची लेखी परीक्षा असते ज्यात 6 ते 7 प्रश्न असतात.
चरण 2: भारतीय राष्ट्रीय
गणिती ओलंपियाड (आय.एन.एम.ओ):
आय.एन.एम.ओ दर वर्षी फेब्रूवारी महिन्याच्या रविवारी वेगवेगळ्या
क्षेत्रातील विविध सेंटर मध्ये होतात. फक्त आर.एम.ओ. मध्ये निवड झालेले
वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी आय.एन.एम.ओ साठी पात्र ठरतात.
आय.एन.एम.ओ ही चार तासाची लेखी परीक्षा असते; ज्यात
संपूर्ण देशात एकच प्रश्न पत्रिका असते. आय.एन.एम.ओ मध्ये यश मिळविणा-या
30-35 विद्यार्थ्यांना मेरिटचे प्रमाणपत्र देण्यात येते.
चरण 3:
आंतरराष्ट्रीय गणिती
ओलंपियाड प्रशिक्षण
शिबिर (आय.एम.ओ.टी.सी.)
: यू.एन.एम.ओ. चे प्रमाणपत्र मिळालेल्यांना एक
महिन्याच्या प्रशिक्षण शिबिरासाठी दर वर्षी मे/जून मध्ये
आमंत्रित करण्यात येते. या खेरीज, आय.एन.एम.ओ. मध्ये
मागील वर्षी पारितोषिक मिळविणा-या आणि संपूर्ण वर्ष पोस्टाने अभ्यासक्रम
पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना देखील शिबिराच्या दुस-या चरणासाठी आमंत्रित
करण्यात येते. शिबिरातील काही निवड चाचण्यांद्वारे,
विशेष प्राविण्य असणा-या 6 विद्यार्थ्यांचा एक समूह लहान व मोठ्या गटातून
संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय गणिती ओलंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
करण्यासाठी निवडला जातो.
चरण 4 :
आंतरराष्ट्रीय गणिती
ओलंपियाड (आय.एम.ओ.) शिबिराच्या शेवटी
निवड झालेला 6 मुलांचा गट त्याचा एक नेता आणि उपनेता हे सर्व बरोबर
आय.एम.ओ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात जी साधारणपणे जुलै मध्ये
वेगवेगळ्या देशात संपन्न होते. आय.एम.ओ. मध्ये साडेचार तासाच्या दोन लेखी
परीक्षा दोन दिवसात एका दिवसाच्या अंतराने पूर्ण करायच्या असतात.
आय.एम.ओ.ला जाण्या येण्यासाठी दोन आठवडे लागतात. ज्या विद्यार्थ्यांना
सुवर्ण, रौप्य, आणि ब्रॉन्झ पदके आय.एम.ओ. मध्ये मिळतात त्यांना
एन.बी.एच.एम तर्फे रोख पारितोषिके रु. 5000/-,
4000/- आणि रु. 3000/- या प्रमाणे त्या
वर्षा अखेरीच्या समारंभात शिबिराच्या शेवटी बहाल केली जातात. एम.एच.आर.डी
8 भारतीय प्रतिनिधि सभासदांचा आंतरराष्ट्रीय खर्च उचलते व एन.बी.एच.एम
(डी.ए.ई) संपूर्ण देशांतर्गत असलेल्या कार्यक्रमांचा खर्च पाहते आणि इतर
आंतरराष्ट्रीय सहभागासाठी लागणा-या खर्चांची बाजू संभाळते.
गणिती ओलंपियाडसाठी
अभ्यासक्रम : गणिती ओलंपियाडच्या
अभ्यासक्रमाच्या (विभागीय, राष्ट्रीय
आणि आंतरराष्ट्रीय) पूर्व-पदवी गणित असते. आर.एम.ओ ते आय.एन.एम.ओ ते
आय.एम.ओ. अशी पायरी अवघड होत जाते.
गणिती ओलंपियाड हे
खालील पाठ्यपुस्तकांमधून मिळू
शकते :
मॅथेमॅटिक्स ओलंपियाड प्रायमर, लेखक व्ही. कृष्णमूर्ती,
सी.आर.प्रणेसाचार, के.एन. रंगनाथन आणि बी.जे. वेंकटाचला
(इंटरलाईन पब्लिशिंग प्रा.लि.
बंगलोर).
चेलेंज एन्ड थ्रिल ऑफ प्री-कॉलेज मॅथेमॅटिक्स, लेखक व्ही. कृष्णमूर्ती,
सी.आर.प्रणेसाचार, के.एन. रंगनाथन आणि बी.जे. वेंकटाचला (न्यू एज पब्लिशर,
नवी दिल्ली)
संपूर्ण माहिती साठी : http://math.iisc.ernet.in/matholym-nat.htm
|