|
केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी २००७-२००८ पासूनच्या शैक्षणिक
सत्रापासून खाली दिलेली मार्गदर्शक तत्वे लागू केली गेली आहेत.
प्रवेशप्रक्रिया
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात क्षेत्रीय कार्यालयाद्वारे प्रवेशाच्या
नामांकनासाठीची सूची वगैरेच्या संदर्भात स्थानीय वर्तमान पत्रात क्लस्टर
स्थरावर जाहिरात दिली जाते आणि मुलांना केंद्रीय विद्यालयात नाव
नोंदणीसाठी आमंत्रित केले जाते. या जाहिरातीमधून असे सूचित व्हावे की
केन्द्रीय विद्यालयात प्रवेश फक्त केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी
मर्यादित नसून सर्वांसाठी आहे, फक्त इतर काही गटांतील मुलांना, विशिष्ट
प्राधान्यक्रमांनुसार प्रवेशासाठी अग्रक्रम दिला जाईल. अनुसूचित जाती,
अनुसूचित जमातींसाठी आणि अपंगांसाठी प्राधान्याचा त्यात उल्लेख असावा.
अर्ज, प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा
:
http://kvsangathan.nic.in/guidelines1.aspx
|