प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक नागरिकाच्या आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. आताच काही काळापूर्वी, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या हजेरीपटात, मुलांच्या सातत्यात (टिकून राहण्यात), नियमित उपस्थितीच्या दरात प्रचंड प्रगती केलेली आहे आणि जवळपास दोन-तृतीयांश लोकसंख्येला साक्षर करण्यात यश मिळविले आहे. भारताच्या आर्थिक विकासात भारताच्या सुधारलेल्या शिक्षणपद्धतीचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नेहमीच म्हटले जाते. मात्र त्याच वेळी भारतातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता मात्र नेहमीच काळजीचा विषय राहिला आहे.
-
चौदा वर्षापर्यंतच्या सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे भारतामध्ये संवैधानिक वचन आहे. भारताच्या संसदेने नुकताच शिक्षणाधिकार कायदा मंजुर केला ज्यामुळे शिक्षण हा आता 6-14 या वयोगटातील सर्व मुलामुलींचा मूलभूत हक्क ठरला आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे म्हणजेच सर्व ठिकाणी शाळेची सोय आणि 100% हजेरीपट आणि मुलांचे सातत्य यांचे सुवर्ण उद्दिट्ष्य भारताला अजून गाठायचे आहे. आणि यामधील हे अंतर भरुन काढण्याकरीताच सरकारने 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरु केले आहे. हे अभियान जगातील अशा प्रकारच्या काही सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या ह्या युगात शिक्षणातील ’आहे’ आणि ’नाही’ वर्गातील, विशेषतः ग्रामीण भारतातील दरी भरुन काढण्याचे फार मोठे काम आयसीटी करत आहे. इंडिया डेव्हलपमेंट गेटवेची ही प्राथमिक शिक्षण शाखा म्हणजे भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिट्ष्य गाठण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मुबलक साहित्य आणि संदर्भ उपलब्ध करुन देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा एक प्रयत्न आहे.
|