माहिती मिळविण्यासंबंधी एका आईच्या गरजेचे समाधान
एका दीड वर्षाच्या मुलीची आई ...............
एका दीड वर्षाच्या मुलीची आई म्हणून मी नेहमी माझ्या मुलीच्या सामान्य वाढीबाबत साशंक असे. मला वाटायचे की फक्त आरोग्य कर्मचारीच मला याबद्दल सांगू शकतात. पण गावांमध्ये राहून, आपल्याला जेव्हां गरज लागेल तेव्हा आरोग्य कर्मचारी बोलविणे फार सोपे काम नाही.
मी अश्विनी सेंटरमध्ये (ग्रामीण सूचना केंद्र) नियमित जात असते, कंप्यूटर शिकण्यासाठी. माझ्या भेटींच्या दरम्यान एकदा, अश्विनी सेंटर संचालिकेने मला www.indg.in पोर्टलची माहिती दिली. साइट पाहिल्यावर मला फार आनंद झाला. मी या आधी तेलुगूमध्ये इतकी उपयुक्त साइट कधीच पाहिली नव्हती. ताबडतोब, मी अश्विनी सेंटर संचालिकेस, www.indg.in पोर्टल बाल आरोग्य निरीक्षणासंबंधी माहिती देवू शकते का ते विचारले. संचालिकेने मला www.indg.in पोर्टलच्या बाल आरोग्य पानावर जाण्यास मदत केली. मला मॉनिटरिंग सिस्टमचा वापर करणे फार सोपे वाटले आणि, मला माझ्या मुलीविषयी जी माहिती हवी होती ती देखील मिळाली, अगदी सोपे उपाय वापरून!!
माझ्या मुलीच्या वाढीच्या निरीक्षणासंबंधीच्या माहितीखेरीज, मला माझ्या मुलीस आवश्यक असलेल्या पौष्टिक आहाराबद्दल देखील माहिती मिळाली. www.indg.in ने मला आपल्या मुलीच्या प्रकृतीविषयी काळजी वाहणारी आई बनण्यास मदत केली आहे.
सुश्री शुभलक्ष्मी, पोन्नामांडा गांव, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश










