चांगली सेवा देण्यासाठी लोकांना मदत करणे
मी सेकीपट्टी गावांत तगावलगम् .................
मी सेकीपट्टी गावांत तगावलगम् (ग्रामीण सूचना केंद्र) संचालिका म्हणून, गेल्या चार वर्षांपासून काम करीत आहे. मी दहावी पास आहे. मला माझ्या गावांतील लोकांची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे म्हणून मी ह्या क्षेत्रांत काम करते. मला लोकांमध्ये विविध विषयांच्या बाबतीत जागरूकता उत्पन्न करायची आवड आहे. पण, मी हे कसे करू, जर माझ्याजवळ तामिळ भाषेत कोणती ही आधार सूचना नाही.
धन फाउंडेशन आणि InDG टीमने आम्हांला www.indg.in पोर्टलबाबत प्रशिक्षण दिले. तामिळमध्ये असलेली माहिती पाहून मला अत्यानंदच झाला. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर मी लोकांना माझ्या सेंटरवर आणून त्यांना ती वेबसाइट दाखवू लागले. स्त्रियांना आणि कृषकांना माहित असायला हव्या अशा पुष्कळशा गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या.
या माहितीचा उपयोग करण्याखेरीज, मला समजले की आम्ही www.indg.in पोर्टलमध्ये समाविष्ठ् देखील होऊ शकतो. मी वेगवेगळ्या विषयांवर माहिती गोळा करून ती पोर्टलवर टाकण्यास सुरूवात केली. मी पोर्टलवर टाकलेली माहिती पोर्टलवर पाहून मला आणखी काम करण्याचा हुरूप आला.
ह्या वर्षीचा महिला दिवस समारंभ साजरा करतांना, माझ्या सेवांबद्दल माझे कौतुक करण्यात आले. या सगळ्यामुळे मला फार आनंद झाला आहे.
सुश्री. तिलागवती, सेकीपट्टी गांव, मेलूर जिल्हा, आंध्रप्रदेश










