मल्टिमिडिया उत्पादने

'पोषण आणि आरोग्य'

ही एक सर्वसमावेशक मल्टिमीडिया सीडी असून तिचा विकास भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थे (ICMR) च्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) ह्या महत्त्वाच्या संस्थेच्या सहयोगाने करण्‍यात आला आहे. ह्या सीडीमध्ये असलेल्या आशयाचे चार मुख्य विभाग आहेत – आपले अन्न जाणून घ्या, पोषकद्रव्यांची आवश्यकता आणि त्यांचे स्रोत, अन्न आणि रोग, अन्नविषयक सुरक्षितता. सामाजिक पातळीवरील आरोग्यसेवक, उपवैद्यकीय तसेच वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, गृहिणी आणि अन्नपदार्थ व आरोग्यपूर्ण जीवनशैलीमधील त्यांच्या भूमिकेत रस असलेल्या कोणालाही ही सीडी उपयोगी पडेल.

उपलब्‍ध भाषा:

ही सीडी सध्या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे:

  1. इंग्लिश-हिंदी
  2. इंग्लिश-तेलुगु
  3. इंग्लिश-तामिळ
  4. इंग्रजी-मराठी
  5. इंग्रजी-बंगाली
  6. इंग्रजी-आसामी

कोठून विकत घ्‍याल?

  • ही सीडी विक्रीसाठी ह्या ठिकाणी उपलब्ध आहे – प्रकाशन विभाग, ET विभाग, राष्ट्रीय पोषण संस्था, ICMR, जामिया उस्मानिया पोस्ट ऑफिस, हैद्राबाद – 500 604, आंध्र प्रदेश. दूरभाष: 040-27197345
  • प्रत्येक सीडीची किंमत 75.00 रु. आहे
  • 75/- रुपयांचा रेखांकित डिमांड ड्राफ्ट “संचालक, राष्ट्रीय पोषण संस्था” ह्या नावाने व हैद्राबाद येथे देय असलेला काढावा. आपणांस सीडी नोंदणीकृत VPP ने पाठवली जाईल.
  • VPP चा खर्च (फक्त टपाल हशील) ग्राहकाला करावा लागेल.
  • आपले काही प्रश्न असल्यास तेninpub@hotmail.com येथे पाठवा.

सीडीच्या आशयाची थोडी झलक पाहण्यासाठी संबंधित भाषेवर क्लिक करा:  हिंदीतामिळतेलुगु - इंग्लिश

For more details contact: indg@cdac.in


'औषधी, सुगंधी आणि रंगद्रव्ये असलेल्या वनस्पतींचे उत्पादन'

ह्या परस्परसंवादी (इंटरऍक्टिव्ह) सीडीमध्ये व्यापारिक महत्त्व असलेल्या 54 औषधी, सुगंधी आणि रंगद्रव्ये असलेल्या वनस्पतींची माहिती दिली आहे. ह्या वनस्पतींचे महत्त्व राष्ट्रीय औषधी वनस्पती महामंडळाने मान्य केले आहे. उत्पादन, उत्पाद आणि विक्रीसंबंधीची ही माहिती सर्वसमावेशक पद्धतीने स्थानिक भाषांतून दिलेली आहे.

उपलब्ध भाषा: हिंदी - तेलुगुतामिळ- इंग्लिश

(मजकूर पाहण्यासाठी भाषेवर क्लिक करा)

अधिक तपशीलासाठी येथे संपर्क साधा: indg@cdac.in


'तांदुळाच्या पिकाच्या अखेरच्या टप्प्यावरील जोखीम कमी करण्यासाठी मार्गदर्शन'

rice-cultivation.PNGही मल्टिमीडिया सीडी CD तामिळनाडूतील मदुराई येथल्या CCD च्या सहकार्याने बनवण्यात आली आहे. ह्यामध्ये आपत्तींचे परिणाम कमी करण्याच्या मूलभूत गरजेसंबंधीच्या चार कलमी धोरणाचा आढावा घेतला गेला आहे. तामिळनाडूच्या कावेरी त्रिभुज प्रदेशातील सुनामीचा परिणाम झालेल्या शेतकर्‍यांसह चार वर्षे केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगांच्या अनुभवांतून ही सीडी तयार झाली आहे. ह्या सीडीमध्ये ही धोरणे राबवण्याच्या काही सहाय्यक मार्गांचाही आढावा घेतला आहे. ह्या मल्टिमीडिया सीडीचा वापर स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी तसेच संशोधक, विस्तार अधिकारी आणि शेतात प्रत्यक्ष काम करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही होऊ शकतो.

उपलब्ध भाषा: तामिळ – इंग्रजी

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: indg@cdac.in


'स्वस्थिर विवसायम'(शाश्वत शेती)

sustainable-agriculture.PNGशाश्वत मार्गाने पिके घेण्यासंबंधीचे व्यावहारिक मार्गदर्शन ह्या उत्पादाच्‍याद्वारे मिळू शकते. ह्यामध्ये भरपूर चित्रे आणि प्रत्यक्ष शेतासंबंधीचे व्हीडिओ आहेत. शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांना ही सामग्री फार उपयोगी आहे. ह्यामधील आशयाला हैद्राबादमधील शाश्वत शेती केंद्र आणि SERP चा पाठिंबा आहे.

उपलब्ध भाषा: तेलुगु

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: indg@cdac.in


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: