बांबूपासून ऊर्जा

बांबूचा कच्चा माल म्हणून वापर करून गुणवर्धित उत्पादन ..............

बांबूचा कच्चा माल म्हणून वापर करून गुणवर्धित उत्पादने निर्माण करण्याचे तंत्र विकसित, रूढ आणि प्रात्यक्षिक करण्याच्या हेतूने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, बांबूच्या उपयोगितेवर राष्ट्रिय अभियान(National Mission on Bamboo Applications-NMBA) सुरू करीत आहे. ह्या अभियानाचा एक भाग म्हणून वीज निर्मितीसाठी बांबूचा कच्चा माल म्हणून वापर करून गॅसिफायर्स विकसित केले आहेत. ते बांबूमधील टाकाऊ भाग आणि जैव सामग्रीचा वापर करू शकतात.

ज्या राज्यांमध्ये बांबू मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे, तिथे वीज निर्मितीसाठी ह्या गॅसिफायर्सचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, उत्तर पूर्वेकडील राज्ये,कर्नाटक,आंध्र प्रदेश,छत्तिसगढ, मध्य प्रदेश, ओरिसा इ. ह्या सर्व राज्यांमध्ये वीजकेंद्रे उघडायचा सरकारचा विचार नाही, तरी इच्छुक राज्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात.

ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री.कपिल सिब्बल ह्यांनी लोकसभेत दि. ३१ ऑगस्ट २००७ रोजी दिली.

 

स्रोत: http://www.pib.nic.in/release/release.asp?relid=30725


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: