ग्रामीण विद्युतीकरणासाठी लक्ष्य

वर्ष २००९ पर्यंत, उर्वरित सर्व गावांमध्ये वीज ...............

वर्ष २००९ पर्यंत, उर्वरित सर्व गावांमध्ये वीज पुरविण्याच्या हेतूने, एप्रिल २००५ मध्ये भारत सरकारने, ‘ राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना’ सुरू केली. ही योजना ‘ग्रामीण विद्युतीकरण पायाभूत सुविधा व घरगुती विद्युतीकरणांतर्गत’ येते, मात्र सुदूर गावांमध्ये वीज पुरविण्याची जबाबदारी नूतन आणि पुनर्निर्मितीशील ऊर्जा मंत्रालयाची आहे. ‘ राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना’(आर.जी.जी.वी.वाय.) ची कृतियोजना अशी आहे-

२००७-०८ : ४०००० गावे

२००८-०९: १०००० आणि उर्वरित सर्व गावे

ही माहिती, केंद्रीय ऊर्जामंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे ह्यांनी, राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देतांना दिली. आर.जी.जी.वी.वाय. योजना राबविणा-या संस्थांनी, २४.०८.२००७ पर्यंत, ४३१०० गावांचे विद्युतीकरण झाल्याचे सांगितले आहे. ग्रामीण विद्युतीकरणाची राज्यनिहाय स्थिती खालील तालिकेत दर्शविली आहे-

policysupportnewsitem-mr

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: