68% भारतीय कामकरी स्त्रिया जीवनशैली विकारांमुळे त्रस्‍त

दोन तृतीयांश स्त्रिया जीवनशैली विकारांमुळे त्रस्‍त आहेत तर, त्‍यांच्‍यातील 53% कामाच्‍या ताणामुळे आणि नेमून दिलेल्‍या वेळेच्‍या आंत काम पूर्ण व्‍हावे म्‍हणून (डेडलाइन) जेवण टाळून जंक फूड खातात.

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीच्या (असोचेम) सर्वेक्षणानुसार, 21-52 वर्षे वयोगटातील 68% स्त्रियांना जीवनशैली विकार आढळून आले जसे लठ्ठपणा, नैराश्‍य, असाध्‍य पाठदुखी, मधुमेह आणि उच्च रक्तदाब.

ह्या अहवालात पुढे म्‍हटले आहे की भारतीय शहरांमधील 27 टक्‍के स्त्रिया कामकरी असल्‍याने, त्‍यांच्‍या आरोग्‍याचा मुद्दा समाज आणि व्‍यापार दोन्‍हींसाठी मोठ्या काळजीचा विषय आहे.

कामाच्‍या जागी मानसिक ताणाची पातळी कमी असलेल्‍या स्त्रियांच्‍या तुलनेत, कठोर निर्देशांखाली कार्यरत असलेल्‍या 75 टक्‍के कामकरी स्त्रिया कामाचे दीर्घ तास आणि डेडलाइनच्‍या ताणाखाली काम करीत असल्‍याने नैराश्‍य (डिप्रेशन) किंवा सामान्‍य उत्तेजना विकारांनी ग्रस्‍त आहेत.

जास्‍त वेळ काम करणे भाग असलेल्‍या क्षेत्रांत जसे प्रसार माध्‍यमे (मीडिया), नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग आणि फिरतीची नोकरी (टूअरिंग) असलेल्‍या स्त्रिया आजारी असतांना देखील सुट्टी घेवू शकत नाहीत, आणि विशेषत: सध्‍याच्‍या आर्थिक मंदीच्‍या काळात, नोकरी सुरक्षित ठेवण्‍यासाठी बळजबरीने काम करतात, असेही अहवालात म्‍हटले आहे.

तथापि, अहवालात म्हटले आहे की, कारखान्‍यांमधील प्रदूषके आणि पर्यावरणातील विषारी घटक, अपुरी आणि अव्‍यवस्थित झोप, व्‍यायामाची कमतरता, सूर्यप्रकाशात काम करणे, कुपोषण, अल्‍कोहोल आणि मादक द्रव्‍यांच्‍या सेवनामुळेसुध्‍दा नैराश्‍य उद्भवू शकते.

कामकरी स्त्रियांच्‍या महत्‍वपूर्ण आणि वैविध्यपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकत, घर आणि कामाच्‍या ठिकाणी त्‍यांनी आरोग्‍याचा समतोलपणा राखण्‍याची गरज आहे असे अहवालात म्‍हटले आहे.

‘आरोग्‍याकडे दुर्लक्ष केल्‍यास तिच्‍या सभोवतालच्‍या पर्यावरणावर बहुविध परिणाम होतील जसे तिचे कुटुंब, कामाची जागा आणि सामाजिक नेटवर्क,’ अभ्‍यास म्‍हणतो.

‘सर्वेक्षणात सामील 77 टक्‍के स्त्रियांनी आपण नियमित शारीरिक तपासणी टाळत असल्‍याचे कबूल केले,’ कामाची जागा आणि घर यांतील समतोल राखण्‍यामधील त्रस्‍त करणारा ताण, तसेच वैयक्तिक आणि सामाजिक गरजा सांभाळणे यांमुळे स्त्रिया स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतात असे अहवाल पुढे म्‍हणतो.

47 टक्‍के स्त्रिया वर्षातून एकदा आरोग्य संगोपनासाठी ५०० रुपयांपेक्षाही कमी खर्च करतात, तर 22 टक्‍के 500 ते 5000 रुपयांपर्यंत खर्च करतात कारण त्‍यांना लठ्ठपणा, नैराश्‍य आणि स्‍पॉन्डिलायटिस यांसारखे विकार असतात.

29 टक्‍केपेक्षा जास्‍त प्रतिवादी 500 ते 5000 रुपये पर्यंतचा वार्षिक खर्च आरोग्‍य संगोपनासाठी करतात. तथापि, ह्या सर्व स्त्रियांपैकी बहुतेकींना निम्‍न किंवा उच्‍च रक्‍तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, दमा, मूत्रविषयक संसर्ग अ‍ाणि संधिवात असल्‍याचे निदर्शनास आले.

स्‍त्रोत: असोचेम



Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: