१०८ आपत्कालीन प्रतिसाद सेवा
|
१-०-८ आपत्कालीन प्रतिसाद सेवा वैद्यकिय,
पोलिस आणि आगविषयक आपत्कालीन स्थितींसाठी एक २४ X ७ आपत्कालीन सेवा आहे.
ही सेवा आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा, तामिळनाडू, राजस्थान,
कर्नाटक, आसाम, मेघालय आणि मध्य प्रदेश या संपूर्ण राज्यांत उपलब्ध
आहे.
|
|
याची मुख्य वैशिष्ट्ये
आहेत
- ही २४ X ७ आपत्कालीन सेवा आहे.
- टोल फ्री क्रमांक लॅण्डलाईन किंवा
मोबाईलवरुन उपलब्ध आहे.
- टोल फ्री क्रमांक लॅण्डलाईन किंवा
मोबाईलवरुन उपलब्ध आहे.
१-०-८ हा नंबर खालील
कारणांसाठी वापरला जातो:
- प्राण वाचविण्यासाठी
- चालू असलेला एखाद्या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी
- आगीची सूचना देण्यासाठी
१०८ आपत्कालीन प्रतिसाद सेवेने ६८००
रुग्णालयांशी एमओयू (सांमजस्य करार) केलेला आहे जी पहिल्या २४ तासांसाठी
सुरुवातीचे स्थायीकरण मोफत देतील.
-
|
वैद्यकिय आपत्कालीन
स्थिती
|
पोलिस आपत्कालीन
स्थिती
|
आग आपत्कालीन
स्थिती
|
|
गंभीर दुखापती
|
चोरी/ दरोडा/ घरफोडी
|
भाजणे
|
|
हृदयविकाराचा झटका
|
रस्त्यावरील मारामारी
|
आग लागणे
|
|
पक्षाघात
|
मिळकतीवरुन झालेले वाद
|
औद्योगिक आगविषयक आपत्ती
|
|
श्वसनविषयक
|
स्वतःहुन करुन घेतलेली दुखापत/ आत्महत्येचा प्रयत्न
|
|
|
मधुमेह
|
चोरी
|
|
|
गर्भावस्था/नवजात बालके/ लहान बालके
|
मारामारी
|
|
|
अपस्मार
|
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ
|
|
|
बेशुद्ध पडणे
|
हरवणे
|
|
|
प्राण्यांनी चावणे
|
अपहरण
|
|
|
उच्च ज्वर
|
ट्रॅफिक समस्या (ट्रॅफिक जाम किंवा मोर्चे, रास्ता रोको,
इ.)
|
|
|
जंतुसंसर्ग
|
बळजबरी, दंगली, इ.
|
|
जर “गंभीर आपत्कालीन स्थिती” नसेल तर १-०-८
ला संपर्क करू नका. हा क्रमांक चौकशी किंवा माहिती मिळविण्यासाठी नाही.
१-०-८ ला विनोद म्हणुन संपर्क करू नका. कारण त्यामुळे खरोखरच आपत्कालीन
परिस्थितीतील कॉल अडुन राहू शकतो आणि एखाद्याचा जीव जाऊ शकतो. जर तुम्ही
चुकुन १-०-८ क्रमांकाशी संपर्क साधला तर अधिका-याने तुम्हाला सांगण्याआधीच
कॉल बंद करा.
|
|
-
|
हैद्राबादमध्ये १५ ऑगस्ट २००५ रोजी १०८
आपत्कालीन प्रतिसाद सेवा सुरू केल्यापासुन जीव्हीके ईएमआरआय सध्या संपूर्ण
आंध्र प्रदेश राज्यात एकात्मिक आपत्कालीन सेवा पुरवते ज्यात ७५२ रुग्ण
वाहीका आहेत ज्या दररोज ४८०० पेक्षाही जास्त आपत्कालीन स्थितींना प्रतिसाद
देतात. जीव्हीके ईएमआरआय च्या १०८ सेवेच्या आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील
यशानंतर उत्तराखंड, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गोवा, आसाम, राजस्थान,
कर्नाटक, मेघालय आणि पंजाब राज्यांच्या सरकारनीदेखिल तशाच प्रकारची
आपत्कालीन सेवा आपापल्या राज्यांत सुरू करण्याविषयी उत्सुकता
दाखविली.
जीव्हीके ईएमआरआय सध्या आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, राजस्थान,
गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, आसाम, मेघालय आणि मध्य प्रदेशमध्ये कार्यरत
आहे.
|
|
-
- आंध्र प्रदेश- ७५२
- गुजरात- ४०३
- उत्तराखंड- १०८
- राजस्थान-१६४
- तामिळनाडू-३८५
- गोवा-१८
- कर्नाटक-४०८
- आसाम-२८०
- मेघालय-२८
- मध्य प्रदेश-५५
|
|
-
|
कोणतीही आपत्कालीन स्थिती हाताळल्यावाचुन
राहू नये म्हणुन स्वयंसेवा हा जीव्हीके ईएमआरआयद्वारा हाती घेण्यात आलेला
महत्त्वाचा उपक्रम आहे. १-०-८ सेवांविषयी ज्ञान आणि माहिती पसरविण्यासाठी
स्वयंसेवकांचा पाठिंबा मिळवण्यास जीव्हीके ईएमआरआय उत्सुक आहे. स्वयंसेवक
खालील बाबींमध्ये मदत करू शकतात:
- ज्यांच्याकडे दूरध्वनी सेवा उपलब्ध नाही अशांकडील आपत्कालीन स्थिती
कळविणे.
- रुग्णवाहीका येईपर्यंत रुग्णाला मदत पुरविणे.
- रुग्णाला रुग्णालयापर्यंत सोबत करणे आणि अज्ञात व्यक्तीसाठी संदर्भ
व्यक्ती म्हणुन भुमिका बजावणे.
- रुग्णवाहीका जेथे रुग्णाला घेण्यासाठी येणार असेल तेथपर्यंत रुग्णाला
नेणे आणि जर रुग्णवाहीका व्यस्त असेल किंवा उपलब्ध नसेल तर रुग्णाला थेट
रुग्णालयात नेणे.
जीव्हीके ईएमआरआयच्या
अपेक्षा
- प्रथम प्रतिसादकर्ता म्हणुन: रुग्णाला रुग्णालयात
पोहोचेपर्यंत सेवा पुरवणे. उदा. जर स्वयंसेवक चिकीत्सक असेल तर वैद्यकिय
आपत्कालीन स्थितींमध्ये ते रुग्णवाहीका पोहोचेपर्यंत रुग्णाला प्राथमिक
उपचार देऊ शकतात.
- सोबती म्हणुन स्वंयसेवक रुग्णाला रुग्णवाहीकेत/
रुग्णालयापर्यंत सोबत करू शकतात.
- चालक म्हणुन जर जीव्हीके ईएमआरआयच्या रुग्णवाहीकेचा
एखादा कर्मचारी एखाद्या अनिवार्य अडचणीमुळे (जसे की आजारपण) अनुपस्थित
असेल तर स्वयंसेवक स्वतः वाहन चालवुन रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवू
शकतो.
- वाहन दुरुस्ती करणारी व्यक्ती म्हणुन जीव्हीके
ईएमआरआयच्या जाळ्यातील वाहनांची लहान/मोठी दुरुस्ती आणि सर्विसिंग करणे
जेणेकरुन प्रत्यक्ष सेवा सुरळीत चालू राहील.
|
|
स्त्रोत: जीव्हीके-
ईएमआरआय