रक्तदान

दर २ सेकंदांनी कोणा ना कोणा व्यक्तीला रक्ताची गरज भासते. तुमच्या रक्तामुळे एकाच वेळी अनेकजणांचे प्राण वाचू शकतात. अपघात झालेल्या व्यक्ती, वेळेआधीच जन्मलेली बालके, मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणारे रुग्ण यांना पूर्ण रक्ताची गरज असते जिथे तुमच्या रक्ताची आवश्यक ती तपासणी झाल्यावर ते रक्त थेट वापरले जाते. अपघात, रक्तक्षय किंवा इतर काही शस्त्रक्रियांनी त्रस्त असणा-या व्यक्तींना मुख्यत्वे केवळ लाल रक्तपेशींची गरज असते ज्या तुमच्या रक्तातून वेगळ्या केल्या जातात.

रक्तदानासाठी काही सूचना
  • रक्तदान करण्यापूर्वी किमान ३ तास आधी पोटभर जेवून घ्यावे.
  • रक्तदान झाल्यावर तुम्हाला दिलेला नाश्ता खा. नंतर व्यवस्थित जेवा.
  • रक्तदानाच्या एक दिवस आधी धूम्रपान करणे थांबवा. रक्तदान झाल्यानंतर ३ तासांनी तुम्ही धूम्रपान करू शकता.
  • रक्तदानाच्या ४८ तास आधी जर तुम्ही मद्य घेतले असेल तर तुम्ही रक्तदान करू शकणार नाही


रक्तदानासंबंधी काही गैरसमज
  • रक्तदान केल्यानंतर मला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटेल: जर तुम्ही द्रव पदार्थ आणि योग्य आहार घेतला तर तुम्हाला थकल्यासारखे आणि गळून गेल्यासारखे वाटणार नाही.
  • मी पुन्हा कामावर जाऊ शकत नाही: तुम्हाला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले तरी तुम्ही कामावर जाऊ शकता.
  • माझे रक्त कमी होईल: जर डॉक्टरांनी तुम्हाला रक्त दान करण्यास परवानगी दिली असेल तर रक्तदान केल्यानंतरही तुमच्या शरीरात पुरेसे रक्त उपलब्ध असते.
  • मी मद्य घेऊ शकत नाही: तुम्ही दुस-या दिवशी घेऊ शकता.
  • रक्तदान करताना त्रास होतो: तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
  • मला चक्कर येईल आणि गरगरायला होइल: रक्तदान केल्यानंतर तुम्हाला असे काहीही होणार नाही.
  • मला एडस होईल!: नाही! डिस्पोझेबल सुया वापरल्या जात आहेत आणि निर्जंतुकीकरणाच्या सर्व पद्धती वापरल्या जात आहेत याची खात्री करा.
  • माझे रक्त सामान्य आहे. मला नाही वाटत त्याला काही मागणी असेल!: म्हणूनच तुमच्या रक्ताची मागणी दुर्मिळ रक्तगटापेक्षा जास्त आहे.

स्त्रोत:BharatBloodBank



रक्ताविषयी काही सत्ये
  • रक्त हा जीवनचक्र चालू ठेवणारा द्रवपदार्थ आहे ज्याचे शरीराच्या हृदयातून, शिरा, धमन्यांमधुन अभिसरण होत असते.
  • रक्ताद्वारे शरीराला पोषकद्रव्ये, इलेक्ट्रोलाइट्स, हार्मोन्स, जीवनसत्त्वे, ऍण्टीबॉडीज, उष्णता, ऑक्सीजन पुरविला जातो.
  • रक्त शरीरातून निरुपयोगी पदार्थ आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकण्यास मदत करते.
  • रक्त जंतुसंसर्गाशी लढते आणि जखमा ब-या करण्यास मदत करुन आपल्याला निरोगी ठेवते.
  • रक्त आपल्या एकुण वजनाच्या ७% असते.
  • नवजात बालकाच्या शरीरात सुमारे १ कप रक्त असते.
  • रक्तातील पांढ-या पेशी शरीरातील जंतुसंसर्गावर सर्वप्रथम हल्ला चढवतात.
  • ग्रॅन्युलोसाइट्स नावाच्या पांढ-या रक्तपेशी रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांशी असतात. त्या विषाणू शोधतात आणि त्यांना नष्ट करतात.
  • लाल रक्तपेशी शरीराच्या अवयवांना आणि उतींना रक्तपुरवठा करतात.
  • रक्ताच्या दोन-तीन थेंबामध्ये जवळपास एक अब्ज लाल रक्तपेशी असतात.
  • लाल रक्तपेशी अभिसरण प्रक्रियेमध्ये १२० दिवस जगतात.
  • रक्तकणिकांमुळे जखम भरुन येण्यास मदत होते आणि रक्ताच्या किंवा इतर कर्करोगाने आजारी असणा-या व्यक्तींना जीवन पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळते.

स्त्रोत:BharatBloodBank



रक्तदान का करावे?

सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.

येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.

तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता.

दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात.

स्त्रोत:BharatbBloodBank



रक्तदात्यांसाठी उपयुक्त लिंक्स

अधिक उपयुक्त लिंक्स

http://www.psbc.org/home/index.htm

http://www.nybloodcenter.org/index.jsp

http://www.blood.co.uk/

http://www.transfusionguidelines.org/

http://www.sanbs.org.za/

http://www.who.int/bloodsafety/en/

http://www.ifrc.org/WHAT/health/blood/index.asp

http://www.bloodservices.ca/






Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: