एसटीडीसहित गर्भधारणा

गर्भवती महिला समागमाव्दारे पसरणा-या रोगांनी संक्रमित होऊ शकतात का ?

होय, ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना ज्या महिला गर्भवती नाहीत त्यांच्याप्रमाणेच समागमाव्दारे पसरणारे रोग होऊ शकतात. 



एसटीडीमुळे एखादी गर्भवती महिला किंवा तिच्या बाळाला काय परिणाम होतो ?

एसटीडीमुळे गर्भवती महिलांमध्ये दिसणारे परिणाम गर्भवती नसलेल्या महिलांमधे दिसणार्‍या परिणामांसारखेच असतात. एसटीडीमुळे गर्भाशयाचा आणि इतर कर्करोग, तीव्र स्वरुपाची काविळ, कटीभागाचा दाहरोग, नपुंसकत्व आणि इतर समस्या होऊ शकतात. महिलांमधील अनेक एसटीडी हे छुपे असतात, म्हणजेच त्यांची चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत.

एसटीडी असलेल्या गर्भवती महिलेला, प्रसुतीच्या कळा लवकर येऊ शकतात, गर्भाशयात बाळाच्या भोवती असणारा पडदा लवकर फाटणे, आणि प्रसुतीनंतर गर्भाशयात संक्रमण होऊ शकते.  एखाद्या गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला प्रसुतीच्या आधी, दरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतरही एसटीडी संक्रमित होऊ शकतो.  काही एसटीडी (जसे सायफिलीस) नाळेत प्रवेश करतात आणि बाळ गर्भाशयात असतानाच त्याला संक्रमित करतात.  अन्य एसटीडी (जसे परमा, क्लॅमिडीया, हीपॅटायटीस ब आणि गुप्तांगाजवळ नागीण ) हे प्रसुतीच्या वेळी बाळ योनीमार्गातून बाहेर येत असताना त्यावेळी त्याला होऊ शकतात.  एचआयव्ही हा गर्भधारणेच्या दरम्यान नाळेतून प्रवेश करतो, बाळाला जन्मादरम्यान संक्रमित करु शकतो, आणि इतर एसटीडीच्या तुलनेत, बाळाला स्तनपानाव्दारे संक्रमित करु शकतो.

बाळांना होणा-या एसटीडीच्या नुकसानकारक प्रभावांमधे मृत बाळ जन्माला येणे, जन्मावेळी वजन कमी होणे (पाच पाऊंडापेक्षा कमी), डोळे येणे, न्यूमोनिया, नवजात बाळाला रक्तप्रवाहात संक्रमण होणे, मेंदूला नुकसान पोचणे किंवा शरीराच्या हालचालींमधे समन्वय नसणे, अंधत्व, बहिरेपणा, तीव्र स्वरुपाची काविळ, मेंदूज्वर, यकृताचा तीव्र आजार आणि कठीणपणा यांचा समावेश आहे. 



गर्भवती महिलांची एसटीडीसाठी चाचणी केली पाहिजे का ?

गर्भवती महिला ज्यावेळी प्रसूतीपूर्व पहिल्या भेटीसाठी येतात त्यावेळी त्यांची एसटीडीसाठी तपासणी करावी अशी समागमाव्दारे पसरणा-या रोगांच्या उपचारांमधे शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेतः

  • क्लॅमिडीया
  • परमा
  • हिपॅटायटीस ब
  • हिपॅटायटीस क
  • एचआयव्ही
  • सिफिलिस


गर्भधारणेच्या दरम्यान एसटीडीवर उपचार करता येऊ शकतो काय ?

क्लॅमिडीया, परमा, सायफिलीस, केसांचा रोग, आणि योनीमार्गात विषाणू संसर्ग यांच्यावर गर्भधारणेच्या दरम्यान प्रतिजैविकांनी उपचार करता येऊ शकतात.  विषाणूंमुळे होणा-या एसटीडीवर कोणताही उपचार नाही जसे गुप्तांगाजवळ नागीण आणि एचआय़व्ही, परंतु नागीण आणि एचआयव्हीवरील विषाणू-विरोधी औषधाने गर्भवती महिलांमधील लक्षणे कमी करता येतात.  ज्या महिलांना प्रसुतिच्या वेळेस गुप्तांगाजवळ क्रियाशील नागीण असते, त्यांच्या नवजात बाळाला संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची सिझेरीयन पध्दतीने प्रसुती केली जाते.  काही एचआयव्ही-बाधित महिलांसाठी देखील सिझेरीयन पध्दतीने प्रसुती करण्याचा पर्याय आहे.  ज्या महिलांची हिपॅटायटीस ब ची चाचणी नकारात्मक येते, त्यांना गर्भधारणेच्या दरम्यान हिपॅटायटीस ब चे इंजेक्शन देण्यात येते. 



गर्भवती महिला स्वतःला संक्रमणापासून कशा सुरक्षित ठेवू शकतात ?

समागमाव्दारे संप्रेषित होणारे रोग टाळण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे लैंगिक संबंधापासून दूर राहणे, किंवा अशा जोडीदारासोबत दीर्घकालीन एकनिष्ठ संबंध ठेवावेत ज्याची तपासणी करण्यात आली आहे आणि त्याला कोणताही संसर्ग नाही याची खात्री आहे. 






Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: