|
एचआयव्हीचे दोन प्रकार आहेत – एचआयव्ही - 1 आणि एचआयव्ही – 2.
जगभरात एचआयव्ही-1 हाच विषाणू प्रामुख्याने आढळून येतो, आणि सामान्यतः लोक
जेव्हा एचआयव्हीचा प्रकार नमूद न करता त्याबद्द्ल बोलतात तेव्हा ते
एचआयव्ही-1 चा उल्लेख करत असतात.
एचआयव्ही-1 आणि एचआय़व्ही-2 हे दोघेही शरीरात 3 ते 6 महिन्याच्या
कालावधीत प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करण्यास कारणीभूत ठरतात, तथापि
एचआयव्हीच्या बाबतीत प्रारंभिक संक्रमण आणि आजार यांच्या दरम्यानचा
कालावधी हा अधिक असू शकतो.
एचआय़व्ही संक्रमणाचे मार्गः
एखाद्या व्यक्तीला खालील मार्गांनी एचआयव्हीचे संक्रमण होऊ शकतेः
एखादी व्यक्ती ही एचआयव्ही संक्रमित व्यक्तीशी कंडोम न वापरता समागम
करते तेव्हा त्याला किंवा तिला संक्रमण होऊ शकते.
- अयोग्यप्रकारे निर्जंतुक केलेल्या सुया किंवा रुग्णालयीन उपकरणे
एकमेकांना देणेः
संसर्गग्रस्त व्यक्तीच्या शरीरावर वापरलेल्या सुया आणि चाकू, किंवा
काही उपकरणेदेखील, योग्यप्रकारे निर्जंतुक न करता अन्य सामान्य
व्यक्तीच्या शरीरावर वापरली तर तिला संसर्ग होण्याची शक्यता असते.
- असुरक्षित पध्दतीने रक्त चढविणेः
एखद्या व्यक्तीला एचआय़व्ही-बाधित व्यक्तीचे रक्त चढवले गेल्यास तिला
संक्रमण होण्याची शक्यता असते.
- संक्रमित पालकाकडून बाळाला संक्रमणः
एखाद्या एचआयव्ही-पॉझिटीव्ह मातेकडून तिच्या बाळाला गर्भधारणेच्या
दरम्यान किंवा प्रसुतिच्या वेळी विषाणूचे संक्रमण होऊ शकते. स्तनपान
हे देखील संक्रमणाचे एक माध्यम होऊ शकते.
|