1 मे 2009 पासून सर्व नागरिकांसाठी नवीन पेंशन (निवृत्तीवेतन) योजना

पेंशन फंड नियमन आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) शुक्रवारी (1 मे) देशातील सर्व नागरिकांसाठी नवीन पेंशन योजनेचा (न्‍यू पेंशन स्‍कीम - NPS) आरंभ केला. 18 ते 55 वर्षांच्‍या वयोगटातील देशाभरातील कोणीही नागरिक एनपीएसमध्‍ये येऊ शकतो.

एनपीएस टायर-1 ही अनाहरणीय (नॉन-विदड्रॉवल) योजना 1 मे पासून सुरू करण्‍यात आली आहे आणि एनपीएसची टियर-2 ही आहरणीय (विदड्रॉवेबल अकाउंट) योजना येत्‍या 6 महिन्‍यांत सुरू होणार आहे. पीएफआरडीएतर्फे प्रत्‍येक सबस्‍क्रायबर खात्‍यात किमान रू.6000/- चे वार्षिक अंशदान असायला हवे असे निश्चित करण्‍यात आले आहे.

ह्या राष्‍ट्रीय पेंशन योजनेमध्ये (NPS) निवेशकाने कार्यकालाच्‍या दरम्‍यान गुंतविलेली रक्‍कम अंशत: एकरकमी आणि अंशत: वार्षिक भुगतान किंवा पेंशनच्‍या स्‍वरूपात निवेशकास परत मिळेल.

स्‍त्रोत: इंडिया सर्व्‍हर


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: