प्राधिकृत प्रशिक्षण एजन्सीजची अंतिम यादी
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने प्राधिकृत अशा 15 प्रशिक्षण एजन्सीजची अंतिम यादी तयार केली आहे. एनरोलमेंट (नोंदणी) एजन्सीजसाठी काम करणार्या विविध प्रवर्गांतील व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे काम ह्या प्राधिकृत संस्थांमार्फत केले जाईल. ह्या एनरोलमेंट एजन्सीजद्वारे भारतातील रहिवाशांची डेमोग्राफिक (लोकसंख्याविषयक) तसेच बायोमेट्रिक (शारीरिक वैशिष्ट्यांची) माहिती गोळा गेली जाईल व ती UIDAI च्या केंद्रीकृत माहितीकेंद्रात (सेंट्रल डेटाबेस) पाठवली जाईल. तेथे रहिवाशांची आधार साठी नोंदणी होऊन त्यांना UIDAI तर्फे 12 आकडी एकमेव ओळखपडताळणी क्रमांक (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) दिला जाईल.
UIDAI चे DG श्री. आर एस शर्मा म्हणाले “मिळालेली माहिती अचूक व दर्जेदार असण्यासाठी ती मिळवणार्यांरकडे काही तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये (सॉफ्ट स्किल्स) असणे गरजेचे आहे. ह्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांसाठी UIDAI ने प्रमाणन अनिवार्य केले आहे.” ह्यासाठी UIDAI ने एका परीक्षक व प्रमाणक संस्थेची नियुक्ती केली आहे. ह्यामध्ये एखाद्या प्रगणकाकडे, पूर्वनिश्चित मानकांनुसार, नोंदणी करण्याची क्षमता आहे की नाही हे ऑनलाइन परीक्षा घेऊन ठरवले जाईल.
UIDAI ने प्रशिक्षण सक्तीचे केले नसले तरी प्रगणकांसाठी प्रमाणन सक्तीचे केले आहे. UIDAI ने एनरोलमेंट एजन्सीजच्या प्राधिकृततेकरिता रुचिदर्शक निवेदन (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट - EoI) जारी केले आहे. ह्या EOI मध्ये तांत्रिक सक्षमतेचे निकष स्पष्ट केले आहेत. The Training Agencies empanelled with the UIDAI सोबत प्राधिकृत प्रशिक्षण संस्था अशा आहेत – अखिल भारतीय PTU DEP संघटना, Aptech Ltd., C-DAC, Cavalier India, Everonn Education Ltd., Ecit, CMC Ltd., Hero Mindmine Institute, India Can Education Pvt. Ltd., Manipal K12 Education (P) Ltd., Manipal Education, NIIT Ltd., Tata Interactive Systems, DOEACC Society आणि Crux Management.
श्री. शर्मांनी असेही सांगितले की “निबंधक तसेच नोंदणी संस्था, आपापल्या कर्मचार्यां च्या कौशल्याची पातळी वाढवण्यासाठी, ह्या प्राधिकृत प्रशिक्षण संस्थापैकी कोणत्याही संस्थेचे सहाय्य घेऊ शकतील.”
स्रोत: प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो


