बँकेत खाते कसे उघडावे
फायदे
- आपली कमाई सुरक्षित ठेवणे,
- बचत केलेल्या रकमेवर व्याज प्राप्त करण्यासाठी
- तिसर्याल पक्षाकडून पैसा जमा करुन घेण्यासाठी (चेक, बँक ड्राफ्ट, रोख किंवा ऑनलाईन)
- यूटिलिटी बिलाचा भरणा करण्यासाठी (उदा. एलआयसी प्रीमियम, ट्रेनचे तिकीट बुकींग)
बँकेत खाते उघडण्यासाठी काय गरजेचे आहे
- भरलेला अर्ज (हा संबंधित बँकेच्या शाखेतून घेता येतो)
- दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
- ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी
- राहत्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी
- रोख रु. १००० (ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार बदलते)
- एक गॅरंटर (ज्याचे त्या बँकेत खाते आहे) जो आपल्या अर्जावर सही करेल
सूचना: ओळकखपत्र आणि राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी दोन वेगवेगळे कागद पस्तूत केले जावेत.
- ओळखपत्र म्हणून दिल्या जाणा-या प्रमाणासाठी खालीलपैकी कोणतीही वस्तू वापरता येते :
- पासपोर्ट (पत्ता वेगळा असतो अशा वेळी),
- मतदान ओळखपत्र,
- पॅनकार्ड,
- सरकारी/ सैनिक ओळखपत्र,
- एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र,
- वाहन परवाना
- पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो आयडी कार्ड
- राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी खालील पैकी कोणताही कागद लावता येतो :
- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
- पगार-पावती (पत्त्यासकट)
- आयकर/ संपत्ति कर निर्धारण आदेश
- वीज बिल
- दूरध्वनी बिल
- बँक खाते स्टेटमेंट
- एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र
- कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाकडून पत्र
- रेशन कार्ड
- एलपी गॅस बिल
एकदा खाते उघडल्यावर, आपल्याला खालील कागदपत्र मिळतील :
- आपल्या नावाचे फोटो असलेले पासबुक
- एटीएम आणि डेबिट कार्ड (ह्यासाठी कमीतकमी दोन आठवडे लागतात)
- चेक बुक (ह्यासाठीदेखील दोन आठवडे कमीतकमी लागतात)


