पॅनकार्ड साठी मागणीअर्ज ऑनलाइन भरणे
उर्फ पॅन विषयी
पर्मनंट अकाउंट नंबर (PAN – पॅन) कार्ड हे एक छायाचित्रासहितचे कार्ड असते व अशा प्रत्येक कार्डवर कार्डधारकाचा १० अंकी एकमेव क्रमांक (आकडे व अक्षरांनी बनलेला) छापलेला असतो. भारत सकराच्या अर्थमंत्रालयातर्फे पॅनकार्ड दिले जाते व त्याचा उपयोग बँकेत खाते उघडणे, पासपोर्टसाठी अर्ज करणे, ई-तिकिटावर रेल्वेने प्रवास करणे अशा कामांसाठी होतो.
PAN चे उपयोग
खालील बाबींसाठी PAN अनिवार्य आहे:
- आयकराचे (IT) विवरण उर्फ रिटर्न भरणे
- शेअर्स घेण्या-साठी व विकण्यासाठी डीमॅट खाते उघडणे
- खात्यामधून एकावेळी ५०००० रु. पेक्षा जास्त रक्कम काढणे, भरणे अथवा स्थानांतरित करणे
- TDS (उद्गम कर-कपात) खाली मिळणारी सवलतीची रक्कम हस्तगत करणे
पात्रता
- कोणीही व्यक्ती, संस्था किंवा भागीदारीतील उद्योग पॅनकार्डची मागणी करू शकतात. ह्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.
PAN ची मागणी करताना आवश्यक असलेली कागदपत्रे
- पासपोर्ट-आकाराचा चांगल्या दर्जाचा रंगीत फोटो
- फीपोटी रू. ९४ चा डिमांड ड्राफ्ट/ चेक
- ओळख-पडताळणीसंबंधीच्या कागदपत्राची प्रत
- पत्त्याच्या पुराव्याच्या कागदपत्राची प्रत
ओळख-पडताळणीसाठी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शालांत परीक्षा प्रमाणपत्र
- मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे पदवी प्रमाणपत्र
- बँक खाते स्टेटमेंट/ बँकेची खातेपुस्तिका
- शिधापत्रिका
- मिळकत कराच्या आकारणीचे बिल
- पासपोर्ट
- निवडणूक ओळखपत्र
- वाहन चालक परवाना
- लोकसभेच्या अथवा विधानसभेच्या अथवा महापालिकेच्या सदस्याने किंवा राजपत्रित अधिकार्याोने सही केलेले ओळख-पडताळणी प्रमाणपत्र
पत्त्याच्या पुराव्यासाठी
- विजेचे बिल
- टेलिफोनचे बिल
- डिपॉझिटरी खात्याचे स्टेटमेंट
- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
- बँक खाते स्टेटमेंट/ बँकेची खातेपुस्तिका
- भाडेपावती
- नोकरी देणार्यामचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट
- निवडणूक ओळखपत्र
- मिळकत कराच्या आकारणीचे बिल
- वाहन चालक परवाना
- शिधापत्रिका
- लोकसभेच्या अथवा विधानसभेच्या अथवा महापालिकेच्या सदस्याने किंवा राजपत्रित अधिकार्याोने सही केलेले पत्ता-पडताळणी प्रमाणपत्र
टीप: अनुक्रमांक 1 ते 7 मधील कागदपत्रे सादर करताना ती, अर्ज करण्याच्या तारखेपासून, सहा महिन्यांपेक्षा जुनी नसतील ह्याची खात्री करा..
पॅनकार्डसाठी देण्याची फी व ती भरण्याची पद्धत
- पॅनकार्डसाठीच्या मागणीअर्जावर प्रक्रिया करण्यासाठी रु. 94/- (रु. 85.00+10.3% सेवाकर) इतकी फी आकारली जाते.
- ही फी चेक, क्रेडिट कार्ड अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरता येते
- चेक अथवा डिमांड ड्राफ्ट NSDL- PAN ह्या नावाने काढावा.
- डिमांड ड्राफ्ट मुंबईत वटवण्यायोग्य असावा आणि डिमांड ड्राफ्टच्या मागे नाव आणि पोचपावती क्रमांक लिहावा.
- चेकद्वारे रक्कम भरणार्या. अर्जदारांनी कोणत्याही बँकेचा स्थानिक चेक लिहून तो HDFC बँकेच्या देशभरातील कोणत्याही (दहेज वगळून) शाखेत भरावा. अर्जदाराने चेक भरण्याच्या स्लिपवर NSDLPAN असे लिहावे.
PAN साठी ऑनलाइन मागणीअर्ज भरण्याची पद्धत
- PAN साठीचा ऑनलाइन मागणीअर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे वर सांगितल्याप्रमाणे रु. ९४ चा चेक अथवा डिमांड ड्राफ्ट किंवा, फी ऑनलाइन भरण्यासाठी, क्रेडिट कार्ड तयार असणे आवश्यक आहे.
- PAN साठी ऑनलाइन मागणीअर्ज भरण्याकरिता https://tin.tin.nsdl.com/pan/form49A.html अथवा http://www.utitsl.co.in/utitsl/uti/newapp/newpanapplication.jsp वर क्लिक करा.
- ह्या क्रमाने माहिती भरा - वॉर्ड/ मंडल, रेंज, कमिशनर, एरिया कोड, AO कोड, रेंज कोड आणि AO क्रमांकासंबंधी माहिती
- वरील माहिती मिळवण्यासाठी ह्यावर क्लिक करा - https://tin.tin.nsdl.com/pan/servlet/AOSearch?alpha=A&display=N
- ही माहिती संबंधित आयकर कार्यालयातूदेखील मिळवता येईल.
- ह्यानंतर अर्ज भरणे सुरू करा
- अर्जामध्ये आपणांस आपला कार्यालयीन पत्ता लिहावा लागणार आहे. तसा पत्ता नसल्यास. आपला एखादा इतर पत्ता आपण तेथे लिहू कता.
- ह्यानंतर अर्ज सादर (सबमिट) करा.
- अर्जात भरलेली सर्व माहिती बिनचूक असल्याची खात्री करा. ती तशी असल्यास पानाच्या तळाशी लिहिलेले कोड (संकेतन) एंटर करून “Confirm” बटनावर क्लिक करा.
- ह्यानंतर प्रकट होणार्यात अर्जावर पोच (ऍक्नॉलेजमेंट) क्र. दिसेल.
- आपल्या PAN अर्जाचा संदर्भ क्र. म्हणजे हा पोच क्र. होय.
- आपल्या PAN अर्जाची स्थिती तपासण्यासाठी नेहमी हा पोच क्र. सांगा.
- ही पोच जतन करा व नंतर तिची प्रिंट काढा.
- पोच-अर्जाची प्रिंट काढल्यानंतर तीवर आपला रंगीत फोटो चिकटवा व अर्जावर दाखवलेल्या चौकटीत, चौकटीला स्पर्श न करणारी, स्वाक्षरी करा. ह्यासाठी फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करा.
- ह्या अर्जासोबत ओळखपडताळणी तसेच पत्त्याच्या पडताळणीच्या कागदपत्रांची प्रत्येकी एक प्रत आणि रु. ९४ चा डिमांड ड्राफ्ट (DD) जोडा.
- चेक/ DD च्या मागे आपले व नाव आणि पोच क्र. लिहा.
- आपण PAN साठीच्या अर्जाची फी चेकने भरीत असल्यास आपल्या नजीकच्या HDFC बँकेमध्ये हा चेक भरा.
- HDFC बँकेची आपल्या नजीकची शाखा शोधण्यासाठी येथे क्लिक करा
- NSDL च्या कार्यालयाकडे पोच अर्ज पाठवण्यापूर्वी खालील बाबी तपासा:
- पोच अर्ज (रंगीत फोटो चिकटवलेला, स्वाक्षरीसहित)
- ओळखपडताळणीच्या कागदपत्रांची एक प्रत
- पत्त्याच्या पडताळणीच्या कागदपत्रांची एक प्रत
- रु. ९४ चा डिमांड ड्राफ्ट (DD)
- पाकिटावर 'PAN करिता मागणीअर्ज – पोच क्र.' असे लिहा. (उदा. ' PAN करिता मागणीअर्ज - 881010100000097')
- अर्ज येथे पाठवा - NSDL, 'आयकर विभाग PAN सेवा कक्ष, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, सफायर चेंबर्स, तिसरा मजला, बाणेर दूरध्वनी केंद्राजवळ, बाणेर, पुणे- 411045 (महाराष्ट्र)
- आपला पोच अर्ज, डिमांड ड्राफ्ट, व इतर कागदोपत्री पुरावे आपण ऑनलाइन अर्ज केल्यापासून पंधरा दिवसांचे आत NSDL कडे पोहोचणे गरजेचे आहे.
- डिमांड ड्राफ्ट अथवा चेकसहित मिळालेल्या ह्या मागणीअर्जावरील प्रक्रिया संबंधित पुरावे मिळाल्यानंतर तसेच रक्कम जमा झाल्यानंतरच सुरू केली जाईल.
- अधिक माहितीसाठी TIN च्या कॉलसेंटरला 020 – 27218080 ह्या नंबरवर कॉल करा अथवा tininfo@nsdl.co.in, mailto:tininfo@nsdl.co.in येथे मेल पाठवा. किंवा...
- PAN <स्पेस> पोच क्र. असा एसएमएस 53030 वर पाठवून मागणीअर्जाची स्थिती तपासू शकता.
पॅनकार्ड मिळवण्याचा आणखी एक मार्ग
- PAN साठी 49A क्रमांकाचा मागणीअर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- काळ्या शाईच्या बॉलपेनने सर्व अर्ज लिहा, आपला फोटो चिकटवा आणि स्वाक्षरीसाठी दिलेल्या चौकटीत स्वाक्षरी करा.
- 49A क्रमांकाचा अर्ज भरण्यासाठीच्या सूचना समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा
- संबंधित कागदपत्रे तसेच फीसाठीचा DD/ चेक जोडा
- नजीकच्या पॅन केंद्रात हा अर्ज नेऊन द्या.
- पॅनचा मागणीअर्ज स्वीकारणारे नजीकचे केंद्र शोधण्यासाठी ह्यावर क्लिक करा
पॅनकार्डशी संबंधित इतर सेवा-सुविधा
49A क्रमांकाचा अर्ज भरण्यासाठीच्या सूचना समजून घेण्यासाठी येथे क्लिक कराPAN साठी 49A क्रमांकाचा मागणीअर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पॅनचा मागणीअर्ज स्वीकारणारे नजीकचे केंद्र शोधण्यासाठी ह्यावर क्लिक करा
Online application for PAN Card:
आपल्या पॅनसाठीच्या मागणीअर्जाची (NSDL) स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या पॅनसाठीच्या मागणीअर्जाची (UTITSL) स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा


