निवासाच्या पुराव्या”साठी अर्ज करा
बँकखाते उघडण्यासाठी, मोबाईलसाठी सिमकार्ड मिळविण्यासाठी, पॅनसाठी किंवा पासपोर्टसाठी किंवा एलपीजी कनेक्शन इत्यादीसाठी अर्ज करताना, सगळीकडेच संबंधित प्राधिकरणांना वैध निवासाचा पुरावा द्यावा लागतो. नवीन शहरात नव्यानेच स्थायिक झालेली किंवा एखादा खाजगी व्यवसाय करणारी एखादी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती ज्यांना अजून निवासाचा पुरावा मिळालेला नाही, त्यांच्यासाठी निवासाचा पुरावा दिल्याशिवाय कोणतीही सेवा मिळविणे फारच कठीण असते.
यासाठी उपाय म्हणून भारतीय पोस्टाने नाममात्र दराने भारतीय नागरिकांसाठी निवासाचा पुरावा जारी करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या कार्डामध्ये व्यक्तीचे छायाचित्र, निवासी आणि कार्यालयीन पत्ता, जन्मतारीख, रक्तगट आणि धारकाची सही अशी सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
ही सेवा कोठे उपलब्ध आहे?
- ही सेवा केवळ नागरी रहिवाशांसाठी उपलब्ध आहे.
- सध्या ही सेवा केवळ खालील भारतीय शहरांमध्ये उपलब्ध आहे: भुवनेश्वर (ओरिसा), चेन्नई आणि मदुराई (तामिळनाडू), हैद्राबाद आणि वारंगळ (आंध्र प्रदेश).
निवासाच्या पुराव्यासाठी कोण अर्ज करू शकते?
- कोणताही भारतीय नागरीक निवासाच्या पुराव्याच्या कार्डासाठी अर्ज करू शकतो.
- निवासाच्या पुराव्याचे कार्ड मिळविण्यासाठी कोणतीही वयाची अट नाही.
निवासाच्या पुराव्याच्या कार्डाची वैधता
- या कार्डाची वैधता केवळ ३ वर्षांसाठी आहे.
- दर ३ वर्षांनी इच्छुक व्यक्तींना नव्या निवासाच्या पुराव्यासाठी अर्ज करावा लागेल.
- ३ वर्षांच्या वैधतेऐवजी त्याचे दरवर्षी नूतनीकरण करुन घेणे आवश्यक असते.
निवासाचा पुरावा मिळविण्यासाठी फी:
- इच्छुक व्यक्तींना निवासाच्या पुराव्याच्या कार्डासाठी रु. २५० (अर्जाची फी: रु. १० आणि प्रक्रिया खर्च व कार्डाची किंमत: रु. २४०) इतकी फी द्यावी लागेल.
- प्रत्येक नूतनीकरणाच्या वेळी कार्डधारकाला भारतीय पोस्टाला रु. १४० द्यावे लागतील.
निवासाच्या पुराव्याच्या कार्डासाठी कोठे अर्ज करावा?
- इच्छुक व्यक्ती त्यांचे अर्ज जवळच्या पोस्टऑफिसमध्ये सादर करु शकतात.
मला अर्ज कोठे मिळेल?
- अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करावा?
- अर्ज काळजीपूर्वक इंग्रजीमध्ये भरा आणि सर्व तपशील द्या.
- अर्जावर दोन पासपोर्ट साईजचे रंगीत फोटो चिकटवा.
- अर्जावर सही करा आणि रु. २५० च्या फीसह सादर करा.
- फी रोख द्यावी लागेल.
निवासाच्या पुराव्याचे कार्ड मिळण्याची प्रक्रिया
- अर्ज मिळाल्यानंतर भारतीय पोस्टाचे जनसंपर्क तपासनीस अर्जदाराने अर्जामध्ये दिलेला पत्ता पडताळून पाहतात.
- दिलेल्या माहितीने त्यांचे समाधान झाले की ते निवासाच्या पुराव्याचे कार्ड जारी करतात.
कार्डाचे नूतनीकरण
- प्रत्येक कार्डधारकाला प्रत्येक वर्षी रु. १४० फी भरुन कार्डाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
- जारी केल्यानंतर ३ वर्षांनी कार्डाची वैधता संपेल आणि निवासाच्या पुराव्याच्या नवीन कार्डासाठी अर्ज करावा लागेल.


