भारतीय कृषी – आव्हानांच्या दिशेने

कृषी क्षेत्र (त्याच्या सर्व संलग्न क्षेत्रांसह) हे निर्विवादपणे ग्रामीण भारतातील सर्वात मोठं सेवा पुरवठादार आहे. आपण नव्या ई-क्रांतीमधे प्रवेश करत असताना, प्रत्येक क्षेत्रात नवीन निर्मिती आणि शोध लागत आहेत.शेतीदेखील त्याला अपवाद नाही.  कृषी क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांबाबत कृषी समुदायाला सतत माहिती देत राहिले पाहिजे.  

ग्रामीण भागातील कृषी समुदाय आणि सेवा पुरवठादारांना सुधारित तंत्रज्ञानाबाबत
उपयुक्त माहिती प्रसारित करण्याचा www.indg.in या संकेतस्थळाचा उद्देश आहे.  ग्रामीण शेतीविषयक परिदृष्यातील विविध पातळ्यांसाठी एक मंच InDG निर्माण करेल – त्यात शेतकरी, सहकारी आणि व्यावसायिक संस्था, शेती अवजारं विक्रेते, खतं आणि रसायन कंपन्या, विमा नियंत्रक आणि कृषीतज्ञ, सल्लागार, आणि कृषी सल्लागार यांचा समावेश राहील.

InDG स्थळावर सध्या कृषी क्षेत्रावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे, ते कृषी पतपुरवठा, धोरणं आणि योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बाजारपेठेची माहिती, शेतीच्या उत्तम पध्दती, शेतीवरील आणि बाहेरील उपक्रम आणि विविध उत्पादनं आणि सेवांशी निगडीत हा भर राहील.

आम्ही पुढील कार्यांव्दारे कृषीमधे एक ज्ञानाधारित समाज निर्माण होण्याचं स्वप्न पाहात आहोत.

  • आमच्या संकेतस्थळाव्दारे वेळेवर आणि विश्वासार्ह माहिती, तुमच्या भाषेत पुरवणे.
  • तज्ञांसोबत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी एक मंच निर्माण करणे आणि शेतीतील दैनंदिन कामांचे नियोजन करणे.
  • मागणीनुसार सर्व विस्तार आणि सल्ला सेवांची उपलब्धता करवणे.

Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: